‘पूरग्रस्त भागात वीजबिल वसूल करू नका’ , उर्जामंत्री Nitin Raut यांचे आदेश

| Updated on: Jul 30, 2021 | 6:49 PM

पुढील निर्णय होईपर्यंत विजबिलाबाबत कसलीही सक्ती करू नये असेही प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत. पुरबाधित भागातील वीजबिल माफी करण्याचा अधिकार  मंत्रिमंडळाला असल्याचेही राऊथ यांनी यावेळी स्पष्ट केले.

सांगली : मागील सरकारने 56 हजार कोटी वीज बिल थकीत ठेवले, त्यामुळे कर्ज घेण्याची वेळ आली. पुरबाधित भागात कसलीही विजबिलाची वसुली करू नये, असे आदेश ऊर्जा मंत्री नितिन राऊत यांनी दिले. राज्यात ज्या ज्या भागात पूरस्थिती होती अशा भागातील वीज कनेक्शन तातडीने सुरू करा. पुढील निर्णय होईपर्यंत विजबिलाबाबत कसलीही सक्ती करू नये असेही प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत. पुरबाधित भागातील वीजबिल माफी करण्याचा अधिकार  मंत्रिमंडळाला असल्याचेही राऊथ यांनी यावेळी स्पष्ट केले.