अमरावती लोकसभेच्या जागेवरून कडू यांनी आपली भूमिका केली स्पष्ट; म्हणाले, ”युती तर युती नाहीतर एकटा”
बच्चू कडू यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15 ते 20 विधानसभा मतदारसंघ मागीतले आहेत. तर लोकसभेची एक जागा लढवणार असल्याचं बच्चू कडूंनी सांगितलं. अमरावती लोकसभा मतदारसंघाची जागा मिळावी यासाठी आग्रही असून आपली पुर्ण तयारी असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.
नागपूर : प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला. मात्र यानंतर बच्चू कडू यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15 ते 20 विधानसभा मतदारसंघ मागीतले आहेत. तर लोकसभेची एक जागा लढवणार असल्याचं बच्चू कडूंनी सांगितलं. अमरावती लोकसभा मतदारसंघाची जागा मिळावी यासाठी आग्रही असून आपली पुर्ण तयारी असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर आमच्याकडे अमरावतीत लोकसभेसाठी मजबूत कँडिडेट आहे, मागील वेळेस मी लोकसभा लढलो तेव्हा केवळ पाच हजार मताने पराभूत झालो होतो. त्यामुळे गरज पडली तर आपण रिंगणात उतरू असा इशाराच त्यांनी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना दिला आहे. तर पक्ष मजबूत ठेवण्यासाठीच या जागा मागत असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर भाजप शिंदे गटाला इशारा देताना, युतीने म्हटलं तर युतीत नाहीतर एकट… लढू असंही ते म्हणालेत. या संदर्भात अजून चर्चा केली नाही. मात्र ज्यावेळी चर्चा करू. त्यावेळेस मागणी करू, परिस्थितीनुसार किती जागा लढायचं याचा निर्णय घेऊ, शेवटी जिंकणे महत्वाचे असते असंही ते म्हणालेत.