एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा 'प्रहार', बच्चू कडूंना मोठा धक्का

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा ‘प्रहार’, बच्चू कडूंना मोठा धक्का

| Updated on: Oct 07, 2024 | 11:39 AM

मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी आमदार बच्चू कडू यांची साथ सोडली आहे. राजकुमार पटेल हे येत्या १० ऑक्टोबरला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. यानंतर बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह राजकुमार पटेल यांना इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने प्रहारच्या बच्चू कडू यांना जोरदार धक्का दिला आहे. बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्तीचे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांना शिंदेंच्या शिवसेनेनं फोडलंय. राजकुमार पटेल हे बच्चू कडू यांची साथ सोडत १० ऑक्टोबर रोजी शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेणार आहेत. राजकुमार पटेल यांनी प्रहार संघटना सोडल्यानंतर बच्चू कडू यांनी आक्रमक होत शिंदे गट आणि राजकुमार पटेल यांना थेट इशारा दिलाय. तर दुसरीकडे मेळघाटमधून निवडून या… असं बच्चू कडू यांनी म्हटल्याचे राजकुमार पटेल यांनी म्हटले आहे. त्यामुळे राजकुमार पटेल हे संभ्रम निर्माण करताय का? असा प्रश्न सध्या निर्माण होतोय. राजकुमार पटेल यांना शिंदेंच्या शिवसेनेनं फोडल्यानंतर विजय वडेट्टीवारांनी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. तर अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांमध्ये दम नसल्याचे म्हणत एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

Published on: Oct 07, 2024 11:39 AM