'कुणबी-मराठा उमेदवाराला मत देऊ नका, फक्त...', प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

‘कुणबी-मराठा उमेदवाराला मत देऊ नका, फक्त…’, प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Aug 05, 2024 | 2:36 PM

पोहरादेवी येथे आरक्षण बचाव यात्रेत प्रकाश आंबेडकर यांनी हे वक्तव्य केले आहे. 'या निवडणुकीला पूर्णपणे खुणगाठ बांधली पाहिजे की मी ओबीसी समाजातील उमेदवारालाच मतदान करणार आहे. तर ओबीसी उमेदवाराला मतदान करताना कुणबी आणि मराठा समाजातील उमेदवाराला मतं देणार नाही. कारण इथला कुणबी मराठा समाज...'

कुणबी आणि मराठा समाजातील उमेदवाराला मतदान करू नका, तर फक्त ओबीसी समाजातील उमेदवारालाच मतदारन करा, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. पोहरादेवी येथे आरक्षण बचाव यात्रेत प्रकाश आंबेडकर यांनी हे वक्तव्य केले आहे. ‘या निवडणुकीला पूर्णपणे खुणगाठ बांधली पाहिजे की मी ओबीसी समाजातील उमेदवारालाच मतदान करणार आहे. तर ओबीसी उमेदवाराला मतदान करताना कुणबी आणि मराठा समाजातील उमेदवाराला मतं देणार नाही. कारण इथला कुणबी मराठा समाज डबल भूमिका करतो. ओबीसीमध्ये आता जागृती आली की आपलं आरक्षण जात याची जाणीव झाली आहे. यामुळे दोन गट असले तरी आपलं राजकीय भाडंण तरी हे निवडणुकी पूरतं आहे. राजकीय पक्ष्याचे नेते दंगलीच्या उंबरठ्यावर महाराष्ट्र असताना देखील सामाजिक प्रश्नवर भूमिका घेत नाही. हे महाराष्ट्राचा दुर्दैव आहे असं मी मानतो..’, असे आंबेडकर म्हणाले.

Published on: Aug 05, 2024 02:36 PM