Special Report | प्रकाश आंबेडकर यांच्याकडून उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांना 2 ऑफर
VIDEO | प्रकाश आंबेडकर यांनी दिली उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांना 2 ऑफर, नेमकं काय म्हणाले? बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : प्रकाश आंबेडकर यांच्याकडून उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांना 2 ऑफर दिल्यात. यानंतर प्रकाश आंबेडकर यांचा नेमका प्लान तरी काय आहे अशी चर्चा सुरू झालीये. प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून सोबत लढू अस आवाहन केल. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनाही सोबत लढण्याची ऑफर दिली आहे. वंचित बहुजन प्रमुखांचं हे वक्तव्य धाडसी आणि मविआमध्ये चलबिचल निर्माण करणारं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना थेट मेसेज देण्यात आलाय की मविआच्या नादाला लागू नका, आणि तुमचा बळी जावू देऊ नका, असे म्हटले तर प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची युती आहे. पण ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या मविआच्या आघाडीच वंचितचा सहभाग नाही. अशातच प्रकाश आंबेडकर यांनी हे वक्तव्य केले आहे. प्रकाश आंबेडकर जे बोलले त्याची वेळही विशेष आहे. सध्या दहा महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीवरून मविआमध्ये हालचाली सुरू आहे. दावे प्रतिदावे सुरू आहे. प्रकाश आंबेडकर यांची उद्धव ठाकरे यांच्यासह युती असली तरी मविआवर त्यांचा विश्वास दिसत नाहीये. बघा स्पेशल रिपोर्ट.