दिवाळीनंतर कत्तल की रात होणार? प्रकाश आंबेडकर यांनी काय केलं सूचक भाष्य?
VIDEO | दिवाळीनंतर कत्तल की रात होणार आहे, अशी सध्याची परिस्थिती असल्याचे सूचक वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. दिवाळीनंतर मणिपूर आणि गोध्रा सारखं कांड होणार? नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर आणि काय वर्तविली शक्यता ?
संभाजीनगर , २९ सप्टेंबर २०२३ | दिवाळीनंतर कत्तल की रात होणार आहे, अशी सध्याची परिस्थिती असल्याचे सूचक वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. तर कितीही स्फोटत परिस्थिती निर्माण झाली तर शांत राहण्याचं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. वंचित बहुजन आघाडी या पक्षाला इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीमध्ये घेण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, त्यांनी याची विचारणा करण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना पत्र लिहून त्यासंदर्भात एक पत्र देखील लिहिल्याचे सांगितले जात आहे तर याचं कोणतंही उत्तर अद्याप मिळालं नसल्याने प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला पुन्हा एखदा डिवचलं आहे. यावेळी त्यांनी दिवाळीनंतर मणिपूर आणि गोध्रा सारखं कांड होण्याची शक्यताही आंबेडकर यांनी वर्तवली असून दिवाळीनंतर कत्तल की रात होईल अशी सध्या परिस्थिती असल्याचे म्हटले आहे.