पटोलेंनी जॉनी वॉकरचा जबरदस्त अभिनय केला, प्रकाश आंबेडकरांचा निशाणा

पटोलेंनी जॉनी वॉकरचा जबरदस्त अभिनय केला, प्रकाश आंबेडकरांचा निशाणा

| Updated on: Apr 05, 2024 | 5:07 PM

काँग्रेसच्या नाना पटोले यांनी अकोल्यात जॉनी वॉकरचा जबरदस्त अभिनय केला, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं. तर प्रदेश उपाध्यक्ष पुंडकरांना सभेतून दीड तास बाहेर का बसवलं असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोले यांना केला

काँग्रेसच्या नाना पटोले यांनी अकोल्यात जॉनी वॉकरचा जबरदस्त अभिनय केला, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं. तर प्रदेश उपाध्यक्ष पुंडकरांना सभेतून दीड तास बाहेर का बसवलं असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोले यांना केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी टि्वट करत नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘तुम्हाला संविधान वाचावायचे होते, तर आमचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ, पुंडकरांना मविआच्या सभेतून दीड तास बाहेर का बसवलं? काँग्रेस आणि आमच्या नात्यात दुफळीचा प्रयत्न झाल्यानंतर बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या वतीने सभांना येऊ लागले. हे अकोल्यालाही सांगावे’, असा हल्लाबोलही प्रकाश आंबेडकर यांनी टि्वट करत नाना पटोले यांच्यावर केला.

Published on: Apr 05, 2024 05:07 PM