शरद पवारांचा डाव... फडणवीस आणि जरांगे यांच्यातील भाडणं नकली, बड्या नात्याच्या दाव्यानं चर्चा

शरद पवारांचा डाव… फडणवीस आणि जरांगे यांच्यातील भाडणं नकली, बड्या नात्याच्या दाव्यानं चर्चा

| Updated on: Jul 29, 2024 | 12:20 PM

मराठा समाजाचे २२५ आमदार निवडून आणण्याचा शरद पवार यांनी डाव आखला आहे, अशी टीका वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर केली आहे. सध्या मराठा समाजाची जी निती झाली आहे, तशी निती आता इतकी कोणत्याच समाजाची नाही. म्हणून... काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?

आरक्षण बचाव यात्रेतून वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मराठा समाजाचे २२५ आमदार निवडून आणण्याचा शरद पवार यांनी डाव आखला आहे, अशी टीका वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर केली आहे. सध्या मराठा समाजाची जी निती झाली आहे, तशी निती आता इतकी कोणत्याच समाजाची नाही. म्हणून स्वतःचा स्वतः लढा लढायचा असेल कर किमान १०० आमदार यावेळी विधानसभेत गेले पाहिजे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील भाडणं हे नकली आहे, असा हल्लाबोल देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तर देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे हे ओबीसी नाहीत. त्यामुळे त्यांना ओबीसी समाजाशी कोणतंच देणंघेणं नाही, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं असून सडकून टीका त्यांनी केली.

Published on: Jul 29, 2024 12:20 PM