‘वंचित’च्या प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसला नवी ऑफर, काय लिहिलं मल्लिकार्जून खर्गेंना पत्र?
प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला नवी ऑफर दिली असून काँग्रेसला सात जागांवर आम्ही पाठिंबा देऊ. त्या सात जागांची यादी काँग्रेसने द्यावी, असं पत्रच प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला दिलंय. 'वंचित'च्या प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसला नवी ऑफर, काय लिहिलं मल्लिकार्जून खर्गेंना पत्र?
मुंबई, २० मार्च २०२४ : लोकसभेच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीने आपले पत्ते उघड केले नाहीत. त्यातच वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला मदत करण्याची ऑफर दिली. सात जागांवर मदत करू, असे पत्राद्वारे प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना सांगितलंय. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला नवी ऑफर दिली असून काँग्रेसला सात जागांवर आम्ही पाठिंबा देऊ. त्या सात जागांची यादी काँग्रेसने द्यावी, असं पत्रच प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला दिलंय. त्यातच ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षावरून विश्वास उडाल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मात्र मविआ वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही चर्चेसाठी किंवा बैठकीाठी निमंत्रित न करता स्वतंत्र बैठका घेत असल्याचे आंबेडकरांनी पत्राद्वारे म्हटलंय.