5 राज्यांच्या निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदी सरप्राईज देतील, प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

5 राज्यांच्या निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदी सरप्राईज देतील, प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

| Updated on: Oct 22, 2023 | 10:04 AM

tv9 Marathi Special Report | मुंबईत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत प्रकाश आंबेडकर यांची काल चर्चा झाली. प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची भेट झाली, यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ, वंचितच्या इंडिया आघाडीतल्या सहभागावरुन चर्चा सुरु झाली झाल्याचे पाहायला मिळत आहे

मुंबई, २२ ऑक्टोबर २०२३ | मुंबईत शरद पवार आणि सुप्रिया सुळेंसोबत आंबेडकरांची चर्चा झालीय. त्यामुळं वंचितचा महाविकास आघाडीत येण्याचा मार्ग मोकळा होतोय का ? अशी चर्चा सुरु झालीय. प्रकाश आंबेडकर आणि शरद पवारांची भेट झाली आणि वंचितच्या इंडिया आघाडीतल्या सहभागावरुन चर्चा सुरु झाली. सुप्रिया सुळेंनी कॉफीसाठी बोलावलं त्यामुळं पवार आणि सुळेंसोबत कॉफी घेतली. मात्र 5 राज्यांच्या निवडणुकांपर्यंत काही घडेल असं वाटत नाही असं सूचक उत्तरही प्रकाश आंबेडकरांनी दिलंय. यशवंत चव्हाण सेंटर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या पुस्तकावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं..या कार्यक्रमानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळेंसोबत प्रकाश आंबेडकरांची चर्चा झाली. मात्र माध्यमांशी बोलताना, 5 राज्यांच्या निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदीही सरप्राईज देतील असं चकीत करणारं विधान आंबेडकरांनी केलंय.

Published on: Oct 22, 2023 10:04 AM