चिल्लर लोकांच्या गाड्या काय फोडता? शिंदे, पवार, ठाकरे, फडणवीसांच्या..; कोणी केलं अजब वक्तव्य
अमोल मिटकरी आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या चिल्लर लहान लोकांची गाड्या का फोडता, गाड्याच फोडायच्या झाल्यास शरद पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या गाड्या फोडा, असं अजब विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं.
शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याबद्दल बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अजबच विधान केल्याचे पाहायला मिळाले. अमोल मिटकरी आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या चिल्लर लहान लोकांची गाड्या का फोडता, गाड्याच फोडायच्या झाल्यास शरद पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या गाड्या फोडा, असं अजब विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं. परभणीच्या गंगाखेड येथे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सभेला संबोधित करत असताना हे वक्तव्य केले. प्रकाश आंबेडकर कालपासून परभणी जिल्ह्याच्या विविध भागात ओबीसी आरक्षण बचाव यात्रेनिमित्ताने सभा घेत आहेत. आज गंगाखेड येथे आंबेडकरांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत आंबेडकरांनी चक्क शरद पवार देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, शरद पवार यांच्या गाड्या फोडा असं वक्तव्य केले.