आधी ‘वंचित’चा अपमान अन् नंतर ‘महाविकास आघाडी’त स्थान? बैठकीत नेमकं काय घडलं?
मुंबईत जागावाटपावरून महाविकास आघाडीची बैठक झाली. यामध्ये वंचितसह शेकाप, आप आणि समाजवादी पार्टीलाही मविआमध्ये स्थान देण्याचा निर्णय झाला. मात्र त्यापूर्वी बैठकीला आलेल्या वंचितच्या नेत्यांनी मविआकडून अपमान झाल्याचा आरोप केल्याचे समोर आलेय.
मुंबई, ३१ जानेवारी २०२४ : महाविकास आघाडीमध्ये अखेर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला स्थान मिळालं. मुंबईत जागावाटपावरून महाविकास आघाडीची बैठक झाली. यामध्ये वंचितसह शेकाप, आप आणि समाजवादी पार्टीलाही मविआमध्ये स्थान देण्याचा निर्णय झाला. मात्र त्यापूर्वी बैठकीला आलेल्या वंचितच्या नेत्यांनी अपमान केल्याचा आरोप केलाय. महाविकास आघाडीच्या मुंबईतील बैठकीत वंचितला अधिकृतपणे सोबत घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालंय. यासंदर्भातील पत्रकही महाविकास आघाडीने जाहीर केलंय. विशेष म्हणजे हे पत्रक जाहीर करण्यापूर्वी मुंबईत मविआची जागावाटपासंदर्भात बैठक झाली यामध्ये मान-अपमान नाट्यही रंगलं. बैठकीला हजर राहण्यासाठी वंचितकडून प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन फुंडकर बैठकीस्थळी आले मात्र बाहेरच बसून ठेवल्याचे सांगत मविआने अपमान केल्याचा आरोप त्यांनी केलाय. मुंबईतील महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय झालं? बघा स्पेशल रिपोर्ट…