Prakash Ambedkar : ‘.. तर सेन्सॉर बोर्ड सदस्यांच्या घरासमोर आंदोलन करु’, प्रकाश आंबेडकरांचा इशारा
Prakash Ambedkar On Phule Movie : 'फुले' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. विरोधामुळे 11 एप्रिल रोजी प्रदर्शित होणारा फुले चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
फुले चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाला विरोध करण्याचा अधिकार नाही आणि सेन्सॉर बोर्ड आपला विरोध असाच ठेवणार असेल तर सेन्सॉर बोर्डाच्या मेंबरच्या घरासमोर आम्ही निदर्शने केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. महात्मा फुलेंवरील आगामी सिनेमातील काही दृष्ये हटवण्याचा निर्णय सेन्सॉर बोर्डाने घेतलाय. त्यावर त्यांनी हा इशारा दिला आहे. तसंच हा चित्रपट कोणतेही दृश्य न वगळता दाखवावा असंही मागणी यावेळी त्यांनी केली आहे. तसंच सेन्सॉर बोर्डाची जी विचारसरणी चालणार नाही, तर शासनाने मान्यता केलेली विचारसरणी आहे तीच या देशांमध्ये राबवली जाईल, असंही आंबेडकर यांनी यावेळी म्हंटलं.
Published on: Apr 11, 2025 02:38 PM
Latest Videos

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण

पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली

गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना

भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
