Prakash Ambedkar Health : प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर मात्र…
प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने गुरुवारी पहाटे पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पुढील 3 ते 5 दिवस प्रकाश आंबेडकर हे डॉक्टरांच्या निरीक्षणात राहणार आहेत. वंचित सोशल मीडिया पेजवरुन ही अधिकृत माहिती समोर आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब – प्रकाश आंबेडकर यांना अचानक छातीत दुखू लागल्याने गुरुवारी पहाटे साडे चार वाजता त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्याच्या अँजिओग्राफी करण्यात येणार आहे, अशी माहिती बाळासाहेब आंबेडकर यांचा मुलगा सुजात आंबेडकर यांनी दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात येणार आहे. गुरूवारी पहाटे प्रकाश आंबेडकर यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची तपासणी कऱण्यात आली. दरम्यान, डॉक्टरांची एक टीम सध्या त्यांच्यावर उपचार करत आहे. तर प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती सध्या स्थिर असून काळजी करण्याचं कारण नाही. वंचितच्या कार्यकर्त्यांनी रूग्णालय परिसरात येऊ नये, असे आवाहन सुजात आंबेडकर यांनी आवाहन केले आहे.