New Delhi | परमबीर सिंग यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा तर राज्य सरकारला मोठा झटका
सुप्रीम कोर्टात परमबीर सिंह यांचे वकील पुनीत बाली यांनी ते भारतात आहेत. या प्रकरणांचा तपास सीबीआयकडे दिल्यास ते 48 तासात समोर येतील, असं बाली म्हणाले. परमबीर सिंह यांच्या प्रकरणांचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी पुनीत बाली यांनी केली आहे. सीबीआयकडे या प्रकरणांचा तपास गेला तर ते कोणत्याही क्षणी समोर येतील, असं सिंह यांच्या वकिलांनी म्हटलं आहे.
सुप्रीम कोर्टाकडून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे. मुंबई पोलीस आणि सीबीआयनं परमबीर सिंह यांना 6 डिसेंबरपर्यंत अटक करु नये, असे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टात परमबीर सिंह यांचे वकील पुनीत बाली यांनी ते भारतात आहेत. या प्रकरणांचा तपास सीबीआयकडे दिल्यास ते 48 तासात समोर येतील, असं बाली म्हणाले. परमबीर सिंह यांच्या प्रकरणांचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी पुनीत बाली यांनी केली आहे. सीबीआयकडे या प्रकरणांचा तपास गेला तर ते कोणत्याही क्षणी समोर येतील, असं सिंह यांच्या वकिलांनी म्हटलं आहे.
राज्य सरकारसाठी सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का मानलं जातं आहे. सुप्रीम कोर्टात परमबीर सिंह यांच्या वकिलांनी ते भारतात असल्याचं म्हटल्यानं ते परदेशात असल्याचं सांगितलं गेल्याचा दावा खोटा ठरला आहे. परमबीर सिंह समोर आल्यास ते अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.