Pramod Sawant : आज गोव्यात शपथविधी सोहळा, पोलिसांकडून प्रत्येकाची कसून चौकशी

Pramod Sawant : आज गोव्यात शपथविधी सोहळा, पोलिसांकडून प्रत्येकाची कसून चौकशी

| Updated on: Mar 28, 2022 | 10:07 AM

गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी आज प्रमोद सावंत हे दुसऱ्यांदा विराजमान होणार आहेत. आज होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची विशेष उपस्थितीत असणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय. तर प्रत्येकाची कसून चौकशी केली जातेय.

आज गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) हे दुसऱ्यांदा विराजमान होणार आहेत. आज होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांची विशेष उपस्थितीत असणार आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रमोद सावंत दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. गोव्याचा शपथविधी विशेष असल्याने याकडे आज देशभराचं लक्ष असणार आहे. दरम्यान, याठिकाणी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.