विधान परिषदेच्या हक्कभंग सिमितीच्या अध्यक्षपदी प्रसाद लाड
VIDEO | भाजपकडून प्रसाद लाड तर काँग्रेसकडून भाई जगताप अध्यक्षपदासाठी आग्रही मात्र उपसभापतींनी का केली विधान परिषदेच्या हक्कभंग सिमितीच्या अध्यक्षपदी प्रसाद लाड यांची नियुक्ती
मुंबई : विधान परिषदेच्या हक्कभंग सिमितीच्या अध्यक्षपदी प्रसाद लाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे २२ सदस्य असल्याने विधानपरिषदेत हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदी प्रसाद लाड यांची निवड करण्याची मागणी केली जात होती. या मागणीनंतर विधान परिषदेच्या हक्कभंग समितीचे अध्यक्षपद प्रसाद लाड यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. यानंतर विधान परिषद हक्कभंद समितीच्या अध्यक्षपदी प्रसाद लाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, भाजपकडून प्रसाद लाड आणि काँग्रेसकडून भाई जगताप अध्यक्षपदासाठी आग्रही होते. मात्र संख्याबळाचा विचार करता भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याने उपसभापतींकडून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळतेय.
Published on: Mar 14, 2023 11:34 PM
Latest Videos