Kolhapur : हातात कोल्हापूरी अन् चिल्लर, प्रशांत कोरटकर विरोधात शेकडो शिवप्रेमी आक्रमक
कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस स्टेशनबाहेर शिवप्रेमींची गर्दी उसळल्याचे पाहायला मिलाले. यावेळी शेकडो शिवप्रेमी प्रशांत कोरटकर विरोधात चांगलेच आक्रमक झालेत.
इतिहासकार इंद्रजित सावंतना धमकी देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर पोलिसांच्या ताब्यात असून आज त्याला कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस स्टेशनला आणणण्यात आलंय. दरम्यान, त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असून त्याची सुनावणी सुरू आहे. मात्र यापूर्वी कोल्हापुरच्या जुना राजवाडा पोलीस स्टेशनबाहेर शिवप्रेमी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शेकडोच्या संख्येने शिवप्रेमी न्यायालयाबाहेर आक्रमक झाले असून त्यांनी प्रशांत कोरटकरविरोधात आपला संताप व्यक्त केला आहे. यावेळी काही शिवप्रेमींनी आपल्या हातात कोल्हापुरी चप्पला तर काहींनी हातात चिल्लर आणल्याचे पाहायला मिळाले. ज्या पद्धतीने त्याने छत्रपतींचा अवमान केला आहे आणि ज्या पद्धतीने तो राजरोसपणे फिरतोय, जणू त्याला काही फरकच पडत नाही असा त्याचा आव आहे. म्हणून त्याला कोल्हापुरी हिसका दाखवण्यासाठी हातात कोल्हापुरी आणल्याचे शिवप्रेमींकडून सांगितले जातेय. तर कोरटकर सारख्या चिल्लर माणसाला गृहखात्याचा जावई असल्यासारखीच वागणूक त्याला मिळत असल्याचा हल्लाबोल देखील शिवप्रेमींकडून केला जातोय.

'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?

देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र

मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
