Prashant Koratkar : जामीन मिळताच प्रशांत कोरटकर मुंबईच्या दिशेने रवाना
Prashant Kortkar Bail : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपहार्य वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला आज जामीन मिळाला आहे. त्यानंतर बाहेर येताच तो मुंबईकडे रवाना झाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा आणि इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जामीन कोल्हापूर सत्र न्यायालयाने मंजूर केलेला आहे. 15 दिवसांनी आज कोरटकर तुरुंगातून बाहेर आलेला आहे. कोरटकरचा जामीन 2 दिवसांपूर्वीच मंजूर झालेला होता. मात्र कायदेशीर प्रक्रिया आणि सुट्टीमुळे आज कोरटकर बाहेर आलेला आहे. तुरुंगातून बाहेर येताच कोरटकर आता मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. विमानाने कोल्हापूर येथून कोरटकर मुंबईकडे निघाला आहे.
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोन करून प्रशांत कोरटकरने धमकी दिली होती. त्यावेळी त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले होते. याच प्रकरणात प्रशांत कोरटकरवर कोल्हापुरात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो फरार होता. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला तेलंगणामधून अटक केली होती. त्यानंतर तो 15 दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत होता.

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग

इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी

पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?

भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
