“माझी 13 वर्षांची आमदारकी फुकट गेली, कारण…”, असं का म्हणाला ‘हा’ शिवसेनेचा नेता?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचा भूमीपूजन केलं. स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या या विकासकामांचं लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं.विविध कामांचे भूमीपूजन झाल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचा भूमीपूजन केलं. स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या या विकासकामांचं लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं.विविध कामांचे भूमीपूजन झाल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “माझी 13 वर्षांची आमदारकी फुकट गेली, कारण निधी मिळत नव्हता. एकनाथ शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधी आमदारांनाही निधी दिला आहे. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी आधी का नाही हे केलं? असा प्रश्न मला पडला आहे. तसेच मी एकनाथ शिंदे यांना नायक चित्रपटाची प्रतिमा भेट दिली. यामध्ये एका बाजूला अनिल कपूर आणि एका बाजूला एकनाथ शिंदे यांचा फोटो असल्याचं सांगितलं.”
Published on: Jun 25, 2023 05:42 PM
Latest Videos