Video : प्रतापराव जाधवांच्या कार्यालयात उद्धव ठाकरेंचा फोटो कायम, जाधव म्हणातात...

Video : प्रतापराव जाधवांच्या कार्यालयात उद्धव ठाकरेंचा फोटो कायम, जाधव म्हणातात…

| Updated on: Aug 03, 2022 | 10:51 AM

शिवसेना आमदार आदित्य ठाकरे ज्या त्वेषाने, आक्रमकपणे बोलत आहेत, गद्दार म्हणत आहेत, राज्याचा दौरा करत आहेत, हे आधीच केले असते तर ही वेळ आली नसती, अशी टीका बुलडाण्याचे खासदार आणि शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी केली आहे. नवी दिल्लीत त्यांनी टीव्ही 9सोबत संवाद साधला. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर त्यांनी टीका केली आहे. हे सर्व अडीच […]

शिवसेना आमदार आदित्य ठाकरे ज्या त्वेषाने, आक्रमकपणे बोलत आहेत, गद्दार म्हणत आहेत, राज्याचा दौरा करत आहेत, हे आधीच केले असते तर ही वेळ आली नसती, अशी टीका बुलडाण्याचे खासदार आणि शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी केली आहे. नवी दिल्लीत त्यांनी टीव्ही 9सोबत संवाद साधला. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर त्यांनी टीका केली आहे. हे सर्व अडीच वर्षाआधीच केले असते, आमदार, खासदारांना भेटले असते तर आज शिवसेनेवर ही वेळ आली नसती. गद्दार आम्हाला म्हटले जात आहे. मात्र जनता ठरवेल कोणाची भूमिका योग्य आहे आणि कोणाची नाही, असे ते म्हणाले. तर विचारांची लढाई ही विचारांनीच लढली पाहिजे, असे म्हणत उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर हल्ला झालेल्या घटनेचा मी निषेध करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी या घटनेवर दिली. तर फोटो काढल्याने कुणाचे महत्त्व कमी होत नसते, असेही ते म्हणाले.

 

 

Published on: Aug 03, 2022 10:51 AM