'पोरं' सांभाळण्याचा वाद, भाजप अन् 'मनसे'मध्ये आरोप-प्रत्यारोपांचा घणाघात; कुणी काय केला हल्लाबोल?

‘पोरं’ सांभाळण्याचा वाद, भाजप अन् ‘मनसे’मध्ये आरोप-प्रत्यारोपांचा घणाघात; कुणी काय केला हल्लाबोल?

| Updated on: Mar 10, 2024 | 11:50 AM

'दुसऱ्यांची पोरं कडेवर घेऊन आपण कधी राजकारण करणार नाही', अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर केली. तर राज ठाकरे यांच्या टीकेवर भाजपकडूनही जशाच तसं उत्तर देण्यात आलं आहे. बघा काय केला भाजपच्या नेत्यानं हल्लाबोल?

मुंबई, १० मार्च २०२४ : ‘दुसऱ्यांची पोरं कडेवर घेऊन आपण कधी राजकारण करणार नाही’, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर केली. तर राज ठाकरे यांच्या टीकेवर भाजपकडूनही जशाच तसं उत्तर देण्यात आलं आहे. ‘आधी राज ठाकरे यांनी आपली पोरं नीट कडेवर घेऊन पक्ष वाढवा’, असा सल्लाच प्रवीण दरेकर यांनी दिलाय. विशेष म्हणजे भाजपने इतर पक्षांचे नेतेच मोठे केले, असे वक्तव्य अजित पवार हे सत्तेत जाण्याच्या काही महिन्यांपूर्वी म्हटले होते. मात्र आता अजित पवार यांच्या नेत्यांनीच राज ठाकरे यांच्यावर टीका केली. याआधी अजित पवार यांचं वागणं पाहून शरद पवार यांनी आपल्या राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला असं राज ठाकरे म्हणाले होते. तर आज पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकच असल्याचा दावा त्यांनी केलाय. गेलं सरकार असताना राज ठाकरे यांनी भोंग्यावरून अल्टिमेटम दिला होता. मात्र आताच्या सरकारवर त्यांनी हे डरपोक सरकार आहे म्हणत पुन्हा भोंग्यावरून इशारा देणं टाळलं तर आपल्याला सत्ता दिल्यास भोंगे बंद करू, असे राज ठाकरे म्हणाले.

Published on: Mar 10, 2024 11:50 AM