“बाळासाहेबांना मानणारा उद्धव ठाकरेंसोबत राहू शकत नाही”, मनिषा कायंदेंच्या बंडावर भाजपची टीका
शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वीच फायरब्रँड नेत्या मनिषा कायंदे या ठाकरे गटाला रामराम करणार आहेत, आज रात्री त्या 3 माजी नगरसेवकांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मनिषा कायंदेंच्या नाराजी प्रकरणावरून भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वीच फायरब्रँड नेत्या मनिषा कायंदे या ठाकरे गटाला रामराम करणार आहेत, आज रात्री त्या 3 माजी नगरसेवकांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मनिषा कायंदेंच्या नाराजी प्रकरणावरून भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.”बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा शिवसैनिक फार काळ उद्धव ठाकरे सोबत राहू शकत नाही. कारण ज्या पद्धतीने उध्दव ठाकरे नी शिवसेना कँग्रेसच्या पायाशी गहाण ठेवली. शरद पवारांच्या ओजंळीने पाणी प्यायला लागले, यातून शिवसैनिक अस्वस्थ झाला. त्यामुळए शिंदे बाजूला होऊन आमच्यासोबत आले. उरले सुरले मंडळी हे उद्धव ठाकरेंमध्ये बदल होईल, हिंदुत्वचा विचार घेऊन शिवसेना नव्याने उभी करतील अशी अपेक्षा होती, परंतु येरे माझ्या मागल्या अशी उद्धव ठाकरेंती स्थिती असल्याने राहिलेले चांगले नेते, कार्यकर्ते शिंदे साहेब किंवा भाजपची कास धरतील.”