प्रवीण दरेकरांनी नाव घेतलेल्या संस्थांची चौकशी करा
प्रवीण दरेकर यांनी विधीमंडळात नाव घेतलेल्या ज्या 40 संस्थांची नावं घेतली आहेत. त्यांची चौकशी करण्याची मागणी आम आदमी पक्षाचे पक्षनेते धनंजय शिंदे यांनी केली. पंधरा ते सतरा हजार मजूर संस्था, प्रत्येक संस्थांचे दहा ते अकरा संचालक आहेत.
प्रवीण दरेकर यांनी विधीमंडळात नाव घेतलेल्या ज्या 40 संस्थांची नावं घेतली आहेत. त्यांची चौकशी करण्याची मागणी आम आदमी पक्षाचे पक्षनेते धनंजय शिंदे यांनी केली. पंधरा ते सतरा हजार मजूर संस्था, प्रत्येक संस्थांचे दहा ते अकरा संचालक आहेत. त्याच बरोबर मुंबई बँकेत घोटाळा करणारे एकटे प्रवीण दरेकर नाहीत तर त्यांची टोळी असल्याचा आरोप आप पक्षांतर्फे करण्यात आली. यावेळी धनंजय शिंदे यांनी सांगितले की, प्रवीण दरेकर यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसे यांचीही चौकशी केली पाहिजे. आम आदमी पक्षाने प्रवीण दरेकर यांच्यावर टीका करताना महाराष्ट्रातील राजकीय पक्षांवरही जोरदार टीका केली आहे. त्यांचीही चौकशी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
Latest Videos