ही वज्रमूठ सभा नव्हे तर सफेद झूट बोलण्याची स्पर्धा!; भाजप नेत्याचा घणाघात

ही वज्रमूठ सभा नव्हे तर सफेद झूट बोलण्याची स्पर्धा!; भाजप नेत्याचा घणाघात

| Updated on: Apr 17, 2023 | 9:44 AM

उद्धव ठाकरे आपण काँग्रेससोबत गेल्यावर जनाब बाळासाहेब ठाकरे असे होर्डिंग लागल्यावर आपण कोठे होतात? तुमच्या पक्षाच्या वतीने अजान स्पर्धा घेतल्या तेव्हा तुम्ही कुठे होता?, असा घणाघात प्रविण दरेकर यांनी केला आहे.

सोलापूर : भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवर टीका केलीये. “ही वज्रमूठ सभा नव्हती तर महाविकास आघाडीत सफेद झूट बोलण्याची स्पर्धा लागली होती. उद्धव ठाकरे यांची वैफल्यग्रस्त विधाने पुन्हा एकदा पाहायला मिळाली. दिवा विझताना ज्याप्रमाणे फडफड करतो. त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंचं भाषण होतं. महाराष्ट्रातले शेतकरी कर्जमुक्त झाल्याचं ठाकरे बोलले. थापा लावायचे काम ते करत आहेत. या उलट आमच्या सरकारने भुविकास बँकेचे 700 ते 800 कोटी कर्ज माफ केलं. उद्धव ठाकरेंच्या वज्रमूठ सभेतील भाषणातून त्यांचा बालिशपणा दिसून आला, असं दरेकर म्हणाले आहेत. प्रविण दरेकर सोलापुरात माध्यमांशी बोलत होते.

Published on: Apr 17, 2023 09:44 AM