Pravin Darekar | एसटीच्या विलिनीकरणावर बोलण्याऐवजी दडपशाही सुरु आहे - प्रवीण दरेकर

Pravin Darekar | एसटीच्या विलिनीकरणावर बोलण्याऐवजी दडपशाही सुरु आहे – प्रवीण दरेकर

| Updated on: Dec 24, 2021 | 7:06 PM

विलीनीकरणाबाबत बोलण्याऐवजी दडपशाही सुरू आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

मुंबई : यंदाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार घमासान होताना पहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अधिवेशनाआधीच अजय गुजर यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेत असल्याची घोषणा केली मात्र, काही ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांची हा निर्णय मान्य न करता आंदोलन सुरू ठेवले, तसेच विलीकरणावर ठाम असल्याचे सांगत, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली, एसटीच्या विलीनीकरणावरूनच आक्रमक होत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. विलीनीकरणाबाबत बोलण्याऐवजी दडपशाही सुरू आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. तसेच हम करे सो कायदा… म्हणत एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सरकारने केल्याची टीकाही त्यांनी केली आहे. फक्त एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरूनच नाही, तर इतरही अनेक मुद्द्यांवरून त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.