राज्यातील मंदिरे बंद आणि मंत्रालयाचे मदिरालय करायला निघाले - Pravin Darekar

राज्यातील मंदिरे बंद आणि मंत्रालयाचे मदिरालय करायला निघाले – Pravin Darekar

| Updated on: Aug 18, 2021 | 3:41 PM

मंदिर सुरू करावे ही आमचीही मागणी आहे. त्याच्यावर अनेक लोकांचे रोजगार अवलंबून आहेत. या सर्वांचा राज्य सरकारने विचार केला पाहिजे. नियमाच्या चौकटीत हवं तर मंदिरे उघडा, पण मंदिरे उघडली पाहिजेत, असं सांगतानाच एकीकडे डान्सबार, वाईन शॉप सुरू आहे. तिथे रांगा चालतात. फक्त मंदिराच्या रांगा चालत नाहीत. मंत्रालयात दारुच्या बाटल्या सापडतात.

मंदिर सुरू करावे ही आमचीही मागणी आहे. त्याच्यावर अनेक लोकांचे रोजगार अवलंबून आहेत. या सर्वांचा राज्य सरकारने विचार केला पाहिजे. नियमाच्या चौकटीत हवं तर मंदिरे उघडा, पण मंदिरे उघडली पाहिजेत, असं सांगतानाच एकीकडे डान्सबार, वाईन शॉप सुरू आहे. तिथे रांगा चालतात. फक्त मंदिराच्या रांगा चालत नाहीत. मंत्रालयात दारुच्या बाटल्या सापडतात. त्याही चालतात. मंत्रालयाचे मदिरालय करायला हे सरकार निघालं आहे. पण मंदिरे चालू करत नाही. सरकार नक्की काय निर्णय घेतं हेच कळायला मार्ग नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

एका वृत्तसंस्थेने देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात टॉप फाईव्हमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्थान मिळाले आहे. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी टीका केली आहे. हा सर्व्हे कुणी केला? त्यांना काय अॅथोरिटी आहे? कशाच्या आधारावर सर्व्हे केला? असे सवाल प्रविण दरेकर यांनी केले आहेत.