Pravin Darekar यांची मजुर प्रकरणात दाखल गुन्हा रद्द करण्याची याचिका High Court नं फेटाळली
प्रवीण दरेकर हे मजूर नसतानाही त्यांनी मजूर असल्याचं दाखवत मुंबै बँक निवडणूक लढवली. त्यावरुन एमआरआय मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास सुरु आहे. या प्रकरणात कठोर कारवाई होऊ नये आणि दिलासा मिळावा यासाठी दरेकर यांनी उच्च न्यायालयाच याचिका दाखल केली होती.
मुंबई : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून (High Court) दिलासा मिळालेला नाही. मुंबई बँक (Mumbai Bank) बोगस मजूर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने दरेकरांची ही याचिका फेटाळून लावली आहे. प्रवीण दरेकर हे मजूर नसतानाही त्यांनी मजूर असल्याचं दाखवत मुंबै बँक निवडणूक लढवली. त्यावरुन एमआरआय मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास सुरु आहे. या प्रकरणात कठोर कारवाई होऊ नये आणि दिलासा मिळावा यासाठी दरेकर यांनी उच्च न्यायालयाच याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. असं असलं तरी जे योग्य कोर्ट आहे तिथे दरेकर दाद मागू शकतात, असंही उच्च न्यायालयाने म्हटलंय. त्यामुळे आता दरेकर कोणत्या कोर्टात धाव घेणार हे पाहावं लागणार आहे.