VIDEO : माझी छळवणूक करण्याचा मविआ सरकारचा प्रयत्न - Pravin Darekar

VIDEO : माझी छळवणूक करण्याचा मविआ सरकारचा प्रयत्न – Pravin Darekar

| Updated on: Apr 11, 2022 | 3:57 PM

भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची मुंबै बँक मजूर प्रकरणात आज पोलीस चौकशी पार पडली आहे. त्यावरून प्रवीण दरेकरांनी पुन्हा महाविकास आघाडीवर  जोरदार निशाणा साधला आहे. मी पहिल्या दिवसांपासून सांगत आहे, आम्ही लोकशाही मानणारे भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनधी आहोत.

भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची मुंबै बँक मजूर प्रकरणात आज पोलीस चौकशी पार पडली आहे. त्यावरून प्रवीण दरेकरांनी पुन्हा महाविकास आघाडीवर  जोरदार निशाणा साधला आहे. मी पहिल्या दिवसांपासून सांगत आहे, आम्ही लोकशाही मानणारे भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनधी आहोत. आम्ही संजय राऊतांसारखे आक्रसताळे नाही. त्यांना चौकशीला बोलावल्यावर काय नंगा नाच करतात ते आपण पाहिलं आहे. मी जेव्हा जेव्हा चौकशीला बोलवत आहेत, तेव्हा तेव्हा चौकशीला जात आहे. पण त्यांना पोलीस कस्टडी का हवी आहे. त्यांच्या नेत्यांवर ज्या कारवाई होतात. त्याला काऊंटर म्हणून आमच्यावर दबाव आणण्यासाठी हे सर्व सुरू आहे.