मुस्लिम समाजाचा कल विधानसभेलाही मविआकडेच? महायुतीला कशाचा फटका? सर्व्हेतून काय आलं समोर?
विधानसभेत मागासवर्गीय आणि मुस्लीम मतदारांचा कल हा महाविकास आघाडीकडे असल्याचेही या सर्व्हेतून समोर आले आहे. तर लोकसभा निवडणुकीतील मतदार हे महाविकास आघाडीला पसंती देताना दिसताय. येत्या काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वीच सकाळचा एक सर्व्हे चांगलाच चर्चेत आलाय
येत्या काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वीच सकाळचा एक सर्व्हे चांगलाच चर्चेत आहे. समोर आलेल्या या सर्व्हेत महायुतीची चिंता वाढताना दिसतेय. महाराष्ट्रात लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही जनतेची पसंती महाविकास आघाडीला असल्याचे टक्केवारी सांगतेय. मविआला ४८.७ टक्के आणि महायुतीला ३३.१ टक्के पसंती मिळाली आहे. यासह विधानसभेत मागासवर्गीय आणि मुस्लीम मतदारांचा कल हा महाविकास आघाडीकडे असल्याचेही या सर्व्हेतून समोर आले आहे. तर लोकसभा निवडणुकीतील मतदार हे महाविकास आघाडीला पसंती देताना दिसताय. दरम्यान, संविधान धोक्यात या नरेटिव्हचा विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीला फटका बसणार असून मुस्लीम मतदारांचा कमी प्रतिसाद हा महायुतीला असून मविआकडे जास्त कल मतदारांचा असणार आहे, असा सकाळचा सर्व्हे सांगतोय. सकाळ सर्व्हेनुसार बघा कोणाला किती मिळणार प्रतिसाद?