दीपोत्सवावरुन मनसे-भाजप भिडले, सलीम-जावेद यांची उपस्थिती शेलार यांना खटकली
मनसेच्या दीपोत्सवावरून मनसे आणि भाजपमध्ये सध्या वाक् युद्ध सुरूये. मनसेने दीपोत्सवासाठी सलीम खान आणि जावेद अख्तर यांना बोलवलं. मात्र या दोघांची उपस्थिती भाजपच्या आशिष शेलार यांना खटकली आणि मनसेच्या मराठीच्या मुद्यावरच बोट ठेवलं.
मुंबई, १२ नोव्हेंबर २०२३ | मनसेच्या दीपोत्सवावरून मनसे आणि भाजपमध्ये सध्या वाक् युद्ध सुरूये. मनसेने दीपोत्सवासाठी सलीम खान आणि जावेद अख्तर यांना बोलवलं. मात्र या दोघांची उपस्थिती भाजपच्या आशिष शेलार यांना खटकली आणि मनसेच्या मराठीच्या मुद्यावरच बोट ठेवलं. एका दीपोत्सवाचं उद्घाटन सलीम-जावेद यांच्या हस्ते झालं. मात्र मराठी कलाकारही छोटे नाही असे म्हणत आम्ही मराठी कलाकारांच्या हस्ते उद्घाटन केल्याचा टोला आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांना लगावला. गेल्या ११ वर्षांपासून दादरच्या शिवाजी पार्क येथे मनसेकडून दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येते. तर भाजपकडून मुंबईत यंदा नमोत्सवाचं गायिका उत्तरा केळकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. मात्र शेलार यांनी सलीम-जावेद यांच्या उपस्थितीवर बोट ठेवल्याने मनसेकडूनही भाजपला थेट प्रत्युत्तर देण्यात आलं. बघा मनसे काय दिलं प्रत्युत्तर?