येत्या ६ महिन्यात नवनीत राणा जेलमध्ये जाणार? प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक दावा काय?

येत्या ६ महिन्यात नवनीत राणा जेलमध्ये जाणार? प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक दावा काय?

| Updated on: Jan 07, 2024 | 11:00 AM

नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र प्रकऱणाचा निकाल सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. हनुमान चालिसा प्रकरणातही नवनीत राणा यांना १४ दिवस जेलमध्ये राहावं लागलंय. दरम्यान याच प्रकरणाचा दाखला देत प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा केलाय.

मुंबई, 7 जानेवारी 2024 : प्रकाश आंबेडकर यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. सहा महिन्यात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा जेलमध्ये जातील, असा दावा केला. तर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र प्रकऱणाचा निकाल सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. हनुमान चालिसा प्रकरणातही नवनीत राणा यांना १४ दिवस जेलमध्ये राहावं लागलंय. दरम्यान याच प्रकरणाचा दाखला देत प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा केलाय. नवनीत राणांनी निवडणूक अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात अनुसूचित जमातीबाबत दिलेले प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप तर जात प्रमाणपत्र समितीसमोर देखील त्यांच्या जातीचा खोटा दावा केला होता. तर माजी खासदार आनंदराव अडसूळ, सुनील भालेराव यांनी यासंदर्भातल्या याचिका दाखल केल्या होत्या. यानतंर मुंबई हायकोर्टाने राणांचं जात प्रमाणपत्र ८ जून २०२१ रोजी रद्द केलं होतं. काय आहे नेमकं हे प्रकरण? बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: Jan 07, 2024 11:00 AM