महाराष्ट्रात लवकरच राष्ट्रपती राजवट लागणार? रोहित पवार यांनी काय वर्तवली शक्यता बघा

महाराष्ट्रात लवकरच राष्ट्रपती राजवट लागणार? रोहित पवार यांनी काय वर्तवली शक्यता बघा

| Updated on: Feb 25, 2023 | 4:34 PM

VIDEO | राज्यात नवीन राज्यपाल आल्याने राष्ट्रपती राजवट लागणार? काय म्हणाले राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, बघा व्हिडीओ

नाशिक : येत्या निवडणुकीत भाजपची पीछेहाट होईल, हे लोकांचे मत आहे. लोकांच्या विरोधानंतर राज्यातील राज्यपालांना बदलण्यात आलं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता आहे. पण येत्या महिन्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते का? असा प्रश्न लोकांच्या मनात आहे. भाजपा स्वतःकडे पॉवर ठेवण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शक्यता आहे. नवीन राज्यपाल आल्याने राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे, असे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. मध्यावधी निवडणुका कधी लागतील हे मला माहीत नाही. पण नवे राज्यपाल आल्याने राष्ट्रपती राजवट लागू शकते, असे तर्कवितर्क रोहित पवार यांनी दिल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.

Published on: Feb 25, 2023 04:34 PM