Old Pension Scheme Strike | राज्यातील १८ लाख कर्मचाऱ्यांच्या संपात फूट, कुणी घेतली माघार
VIDEO | एकच मिशन, जुनी पेन्शन म्हणून तीव्र आंदोलन पुकारणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या आंदोनलनात आता फूट
मुंबई : जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी राज्यातील 18 लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. या संपात शासकीय कर्मचारी सहभागी झाल्यामुळे सगळी व्यवस्था कोलमडलेली होती. आमच्या मागण्या मान्य करा, त्याशिवाय आम्ही संपातून माघार घेणार नाही, अशी भूमिका शासकीय कर्मचाऱ्यांनी घेतली होती. मात्र आता संप करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनेमध्ये फूट पडल्याचे समोर आले आहे. राज्यातील लाखो कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेसाठी संपात सहभागी झालेले असतानाच प्राथमिक शिक्षक संघ आणि महाराष्ट्र राज्य संघटनेने संपातून माघार घेतल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात फूट पडल्याचे म्हटले जात आहे. प्राथमिक शिक्षक संघ आणि महाराष्ट्र राज्य संघटनेने आपण या संपातून माघार घेत असल्याचे सांगत आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे.
Published on: Mar 14, 2023 06:14 PM
Latest Videos