दिव्यांगांसोबत मोदींचा पुणे मेट्रो प्रवास
11.30 वाजता पुणे मेट्रोचं उद्घाटन करून ते गरवारे स्टेशन पासून मेट्रोने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवास केला. या प्रवासाचे लक्ष दिव्यांगांव्यक्तींनी वेधले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांगांसोबत पुणे मेट्रो प्रवास केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) आज पुणे (pune) दौऱ्यावर आहेत. बहुचर्चित अशा पुणे मेट्रोचे (metro) त्यांच्या हस्ते ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटन झाले. या उदघाटन सोहळ्यात त्यांनी चक्क दिव्यांगमुलांसोबत प्रवास केला. त्यांच्यासोबत दिलखुलास गप्पा मारल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम पुणे महापालिकेतील महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ भव्य पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमानंतर ते पुणे मेट्रोच्या उद्घाटनासाठी रवाना झाले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.