77 व्या स्वातंत्र्यादिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांच्याकडून नव्या योजनेची घोषणा, 15,000 कोटी रुपयांची तरतूद
तसेच देशातील जनतेला शुभेच्छा देखील दिलया. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशातील कामगार, गवंडी, धोबी यांच्यासह आर्थिक दुर्बल घटकांना आर्थिक बळ देण्यासाठी एका मोठ्या योजनेची देखील मोदी यांनी घोषणा केली.
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2023 | भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्यादिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं आहे. यावेळी त्यांनी लालकिल्ल्यावरून ध्वजारोहन केले. तसेच देशातील जनतेला शुभेच्छा देखील दिलया. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशातील कामगार, गवंडी, धोबी यांच्यासह आर्थिक दुर्बल घटकांना आर्थिक बळ देण्यासाठी एका मोठ्या योजनेची देखील मोदी यांनी घोषणा केली. या योजनेतून सरकर कामगारांसाठी काम करेल. तर त्यांच्या उन्नतीसाठी पुढील महिन्यात सरकार १३,००० ते १५,००० कोटी रुपयांची तरतूद असणारी योजना सुरू करणार आहे. ही योजना ‘विश्वकर्मा योजना’ असणार आहे. ही योजना देशातील फर्निचर किंवा लाकडाचे काम करणाऱ्या, सलून चालवणाऱ्या, शूज बनवणाऱ्या आणि घरे बांधणाऱ्या गवंडींना आर्थिक मदत करणार आहे. तसेच पारंपरिक कौशल्य असलेल्यांसाठी देखील ही योजना लागू असेल.