PM Modi Interview : 'डिक्शनरीतील सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे...', खालच्या पातळीच्या टीका करणाऱ्या विरोधकांना मोदींचा टोला

PM Modi Interview : ‘डिक्शनरीतील सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे…’, खालच्या पातळीच्या टीका करणाऱ्या विरोधकांना मोदींचा टोला

| Updated on: May 02, 2024 | 9:21 PM

Prime Minister Narendra Modi Exclusive Interview : निवडणुकीचा प्रचार सुरू असताना हा प्रचार नीती आणि मुद्द्यांवरून भटकताना दिसतोय. अशातच मोदींवर व्यक्तिगत शाब्दिक हल्ले आणि खालच्या पातळीच्या टीका होताना दिसताय. टीव्ही 9 मराठीच्या महामुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशा विरोधकांवर पलटवार करत खोचक टोला लगावला आहे.

देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीचे दोन टप्पे संपले आता तिसरा टप्पा होत आहे. दरम्यान, या निवडणुकीचा प्रचार सुरू असताना हा प्रचार नीती आणि मुद्द्यांवरून भटकताना दिसतोय. अशातच मोदींवर व्यक्तिगत शाब्दिक हल्ले आणि खालच्या पातळीच्या टीका होताना दिसताय. यामध्ये तेलंगनाच्या मुख्यमंत्र्यांनी कोब्रा, संजय राऊत यांनी रावण म्हटल्याचे पाहायला मिळाले. टीव्ही 9 मराठीच्या महामुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशा विरोधकांवर पलटवार करत खोचक टोला लगावला आहे. मोदी म्हणाले, ‘मला चिंता ही आहे की डिक्शनरीतील सर्व शिव्या संपल्या आहेत. आता ते बिचारे करणार काय? आता त्यांना रिसर्च टीम तयार करावी लागेल. मोदींसाठी नव्या शिव्या शोधण्यासाठी. कारण सर्व डिक्शनरी त्यांनी मला शिव्या देण्यासाठी वापरली आहे. एका व्यक्तीला सार्वजनिक जीवनात एवढी घाणेरडी, इतक्या मोठ्या आणि एवढ्या वेळेस शिव्या खाव्या लागत आहेत. हे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये येईल’, असे म्हणत मोदींनी विरोधकांवर हल्ला चढवलाय.

Published on: May 02, 2024 09:21 PM