PM Modi TV9 Interview : 'देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं', 2024 च्या निवडणुकीबद्दल मोदींचं मोठं वक्तव्य

PM Modi TV9 Interview : ‘देशाला मी सांगतोय येस… हे होऊ शकतं’, 2024 च्या निवडणुकीबद्दल मोदींचं मोठं वक्तव्य

| Updated on: May 02, 2024 | 8:55 PM

Prime Minister Narendra Modi Exclusive Interview : टीव्ही 9 मराठीच्या महामुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 ची लोकसभा निवडणूक, 2019 ची आणि 2024 ची लोकसभा निवडणूक या तीन निवडणुकांमध्ये नेमका फरक काय वाटतो? हे स्पष्टपणे सांगितलं. बघा व्हिडीओ

देशातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क TV9 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सक्लूझिव्ह मुलाखत दिली आहे. ‘टीव्ही 9 मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांच्यासह TV9 ग्रुपच्या पाच व्यवस्थापकीय संपादकांनी मोदींची ही महामुलाखत घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ ची लोकसभा निवडणूक, २०१९ ची आणि २०२४ ची लोकसभा निवडणूक या तीन निवडणुकांमध्ये नेमका फरक काय वाटतो? हे स्पष्टपणे सांगितलं. ‘निवडणूक माझ्यासाठी नवीन नाही. मी अनेक वर्षापासून संघटनेत राहून निवडणूक लढवण्याचं काम केलं. त्यानंतर माझ्यावर आयुष्यात पहिल्यांदा गुजरातमधून निवडणूक लढवण्याची वेळ आली. आता मी आणखी एका वेगळ्या भूमिकेत आहे. देश आणि दुनियाच्या नजरेत एका विशेष जबाबदारीसह मी या निवडणुकीच्या मैदानात आहेत.’, असे मोदींनी म्हटले. तर

२०१४ च्या निवडणुकीत जेव्हा आम्ही मैदानात होतो, त्यावेळी लोकांच्या मनात अनेक प्रश्न होते. मोदी नवे आहेत. कोण आहेत. गुजराती बोलतात. पण लोकांच्या मनात आशा होती. २०१४मध्ये आशा होती. काही तरी करेल. जेव्हा २०१९च्या निवडणुकीत गेलो तेव्हा जी आशा होती, त्याचं विश्वासात रुपांतर झालं होतं आणि ते परिश्रम, परफॉर्मन्स, कन्सिस्टन्सी, क्लिअॅरिटी हे सर्व लोकांनी पाहिलं आणि विश्वास वाढला. २०१४ जे आशेने सुरू झालं होतं. विश्वासाच्या काळापर्यंत आलं होतं आता गॅरंटी झाली आहे. २०२४ची निवडणूक.. देशाला मी सांगतोय येस… हे होऊ शकतं. कारण माझा दहा वर्षाचा अनुभव आहे. काय होऊ शकतं आणि काय होऊ शकत नाही. मला माहीत आहे. २०१४ मध्ये मला सेवा करण्याची मोठी संधी होती. मी सेवाभावासाठी समर्पित केलं होतं. आता मला एका नव्या उंचीवर घेऊन जायचं आहे. अनेक संकटाच्या काळातून आम्ही निघून जनतेच्या आशीर्वादाने पुढे आलो. अजून पुढे जाऊ असं मला वाटतं, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला.

Published on: May 02, 2024 08:55 PM