PM Modi Interview : ‘ये तो ट्रेलर है…पिक्चर अभी बाकी है..’, मोदींचा विरोधकांना इशारा, या पिक्चरमध्ये नेमकं काय? बघा मोदी काय महणाले?
Prime Minister Narendra Modi Exclusive Interview : पिक्चर अभी बाकी है, असं म्हणत विरोधकांना मोदींनी एकप्रकारे इशाराच दिला होता. पण मोदी म्हणताय त्या पिक्चरमध्ये काय काय आहे? असा सवाल टीव्ही ९ नेटवर्कच्या महामुलाखतीत मोदींना विचारण्यात आला, काय दिलं मोदींनी उत्तर?
पंतप्रधान नरेंद्र मोदी एका भाषणात म्हणाले होते, ये तो बस ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, असं म्हणत विरोधकांना मोदींनी एकप्रकारे इशाराच दिला होता. पण मोदी म्हणताय त्या पिक्चरमध्ये काय काय आहे? असा सवाल टीव्ही ९ नेटवर्कच्या महामुलाखतीत मोदींना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी यावर थोडक्यात उत्तर दिलं. मोदी म्हणाले, विरोधकांची झोप उडण्याचं कारण नाही. एवढा मोठा देश.. दहा वर्षात मी जे केलं, त्यामुळे माझा विश्वास वाढला आहे. पण माझी जी विचार करण्याची पद्धत आहे. मला खूप काही करायचं आहे. मी देशाला सांगतो. तुम्हाला आनंद वाटेल. तुम्ही मोदींवर प्रेम करता, मोदींना आशीर्वाद देता. पण मोदी झोपणार नाही. मी देशाला अजून उंचीवर नेणार आहे. मी अनेक नव्या गोष्टी करणार आहे. मला जगात हिंदुस्थानचा जयजयकार करायचा आहे, असं मोदी म्हणाले. मोदींनी यावेळी असेही म्हटले की, देशातील जनता समजदार आहे. त्यांचा प्रत्येक डाव जाणून आहे हे त्यांना माहीत नाही. ते पाच गॅरंटी आणो, २५ गॅरंटी आणू द्यात, ७५ गॅरंटी आणूद्यात त्यांना शब्द वर खाली करू द्या, वेडंवाकडं बोलू द्या. त्यामुळे जनमत बनत नाही. त्यामुळे तुम्हाला टीव्ही मीडियात प्रसिद्धी मिळते. पण लोकांच्या मनात जागा मिळत नाही, असे म्हणत मोदींनी विरोधकांना फटकारले.