काश्मीर फाईल्सवरुन राजकारण तापणार

काश्मीर फाईल्सवरुन राजकारण तापणार

| Updated on: Mar 15, 2022 | 5:06 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द काश्मीर फाईल्ससारख्या चित्रपटांची निर्मिती होणे गरजेची आहे असे त्यांनी व्यक्त केले आहे. या चित्रपटाविषयी मत मांडताना त्यांनी सांगितले की, गेल्या कित्येक वर्षांपासून दाबून ठेवलेले सत्य समोर आणले गेले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या सिनेमांची निर्मिती होणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. त्याबरोबरच काश्मीर फाईल्ससारख्या चित्रपटामुळे कायदा सुव्यवस्था निर्माण करण्याचाही प्रयत्न […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द काश्मीर फाईल्ससारख्या चित्रपटांची निर्मिती होणे गरजेची आहे असे त्यांनी व्यक्त केले आहे. या चित्रपटाविषयी मत मांडताना त्यांनी सांगितले की, गेल्या कित्येक वर्षांपासून दाबून ठेवलेले सत्य समोर आणले गेले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या सिनेमांची निर्मिती होणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. त्याबरोबरच काश्मीर फाईल्ससारख्या चित्रपटामुळे कायदा सुव्यवस्था निर्माण करण्याचाही प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. तर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले की, चित्रपटावर आधारित काही वातावरणात सनासनाटी निर्माण करु नका. अशा चित्रपटांमुळे समाजात अंतर वाढवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मतही वळसे-पाटील यांनी व्यक्त केले. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात काश्मीर फाईल्सवरुन राजकारण तापणार असल्याचे दिसत आहे.