पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर, काळाराम मंदिरातील रामापुढं नतमस्तक अन्...

पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर, काळाराम मंदिरातील रामापुढं नतमस्तक अन्…

| Updated on: Jan 12, 2024 | 2:08 PM

नाशिकमध्ये नरेंद्र मोदी यांचा रोड शो, त्याचप्रमाणे रामकुंड येथे गोदा आरती करण्याचे नियोजन देखील कऱण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरात काळारामाचे दर्शन घेतले. इतिहासात प्रथमच देशाचे पंतप्रधानांनी काळारामाचं दर्शन घेतलं आहे. मोदी काळाराम मंदिर आणि रामकुंड या ठिकाणी येत असल्याने, याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय

नाशिक, १२ जानेवारी २०२४ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती दर्शविली. या निमित्ताने नाशिकमध्ये नरेंद्र मोदी यांचा रोड शो, त्याचप्रमाणे रामकुंड येथे गोदा आरती करण्याचे नियोजन देखील कऱण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरात काळारामाचे दर्शन घेतले. इतिहासात प्रथमच देशाचे पंतप्रधानांनी काळारामाचं दर्शन घेतलं आहे. मोदी काळाराम मंदिर आणि रामकुंड या ठिकाणी येत असल्याने, याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. नरेंद्र मोदी हे रामकुंड या परिसरात येणार असल्याने रामकुंडाला फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली. त्याचप्रमाणे विद्युत रोषणाई देखील करण्यात आलीय. या सर्व कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसराचे महत्त्व वाढले आहे. त्याचप्रमाणे पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

Published on: Jan 12, 2024 02:08 PM