CDS Bipin Rawat Death | पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बिपीन रावत यांना श्रद्धांजली
नवी दिल्ली : सीडीएस बिपीन रावत यांचं पार्थिव दिल्लीत दाखल झालं आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच राष्ट्रपती, संरक्षणमंत्री, आणि सैन्याच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांकडूनही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
नवी दिल्ली : सीडीएस बिपीन रावत यांचं पार्थिव दिल्लीत दाखल झालं आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच राष्ट्रपती, संरक्षणमंत्री, आणि सैन्याच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांकडूनही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. बिपीन रावत यांच्या जाण्याने संपूर्ण देश शोकाकूल वातावरणात गेला आहे. दिल्लीच्या पालम विमानतळावर त्यांचं पार्थिव दाखल झाल आहे. रावत यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळी काही वेळ दिल्लीतील सर्वसामान्य लोक रावत यांना श्रद्धांजली वाहणार आहेत. त्यानंतर दिल्ली कैंट बराड़ स्क्वायरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Latest Videos