'मोदी तेरी कब्र खुदेगी...', विरोधकांच्या पसंतीच्या घोषणेवर पंतप्रधान आपल्या भाषणात नेमकं काय म्हणाले?

‘मोदी तेरी कब्र खुदेगी…’, विरोधकांच्या पसंतीच्या घोषणेवर पंतप्रधान आपल्या भाषणात नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Aug 10, 2023 | 7:54 PM

VIDEO | लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना चांगलेच फटकारले, काय सोडले टीकास्त्र?

नवी दिल्ली, १० ऑगस्ट २०२३ | मागील तीन दिवसांपासून लोकसभेत अविश्वास प्रस्ताव सादर झाल्यापासून सभागृहात चांगलाच गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. अखेर आज विरोधकांच्या आरोपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर देत विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव लोकसभेत फेटळण्यात आल्याचे पाहायला मिळाले. गेल्या तीन दिवसांपासून सभागृहात विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारवर जोरदार टीका झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र या टीकेवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले. “विरोधक डिक्शनरी खोलून अपशब्द घेऊन आले आहेत. विरोधकांनी माझ्यासाठी कुठून कुठून शोधून अपशब्द आणले. दिवसरात्र मला वाईट बोलण्याची एकही संधी सोडत नाही. त्यांची आवडती घोषणा आहे की, मोदी तेरी कब्र खुदेगी..पण त्यांच्या शिव्या, असंवैधानिक भाषा..मी त्याचं टॉनिक बनवतो.”, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांची टीकाही सकारात्मक घेतल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Aug 10, 2023 07:54 PM