क्या बात है! अवघ्या १२ तासात मुंबई ते दिल्ली प्रवास, एक्स्प्रेसवेचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

क्या बात है! अवघ्या १२ तासात मुंबई ते दिल्ली प्रवास, एक्स्प्रेसवेचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

| Updated on: Feb 12, 2023 | 9:48 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'दिल्ली ते मुंबई एक्स्प्रेस वे'चं लोकार्पण होणार

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ‘दिल्ली ते मुंबई एक्स्प्रेस वे’च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. त्यामुळे या एक्सप्रेस वेवरून आता अवघ्या १२ तासात दिल्ली – मुंबई प्रवास करता येणार आहे. पहिला टप्पा हा २४८ किमी चा असून हरियाणा ते राजस्थान दरम्यानचा असणार आहे. ‘दिल्ली ते मुंबई एक्स्प्रेस वे’साठी १२ हजार कोटीहून अधिक रक्कम लागली आहे. ‘दिल्ली ते मुंबई एक्स्प्रेस वे’ हा आठ पदरी रस्ता असून १२ ते १४ तासात सुपरफास्ट प्रवास करणं शक्य होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असून दोन्ही राजधान्यांना जोडणारा हा राजमार्ग असणार आहे. दिल्ली मुंबई वे हरियाणातील राजीव चौक, गुरूग्राम येथून सुरू होईल, आणि मेवात, जयपूर कोटो, भोपाळ अहमदाबाद मार्गे मुंबईला जाणार आहे. दिल्ली ते मुंबई जाण्यासाठी २० तासाऐवजी केवळ १२ तास लागणार असून द्रुतगती मार्गावरून लोकांना त्यांच्या खासगी वाहनांनी सहज जाता येणार आहे.

Published on: Feb 12, 2023 09:48 AM