VIDEO |देशात येताच पंतप्रधान मोदी पोहचले बेंगळुरूला; शास्त्रज्ञांची भेट घेणार
चांद्रयान-3 मोहिमेत भारताने मिळवलेल्या दैदिप्यमान यशानंतर पंतप्रधान मोदी हे बेंगळुरूला पोहोचले. यावेळी त्यांनी परदेश दौऱ्यातर माय देशात येताच शास्त्रज्ञांची भेट घेण्याचे ठरवले होते. त्याप्रमाणे ते आज शास्त्रज्ञांची भेट घेणार आहेत.
बेंगळुरू : 26 ऑगस्ट 2023 | दक्षिण आफ्रिका आणि ग्रीस या दोन देशांच्या दौऱ्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. जोहान्सबर्ग येथे 15 व्या ब्रिक्स परिषदेत मोदी सहभागी झाले होते. याचदरम्यान इस्त्रोच्या टीमने जगात मोठा कारणामा केला आणि जे कोणाला जमलं नाही ते करून दाखवलं. भारताची चांद्रयान-3 मोहिम फक्ते झाली. तर लँडर हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले. त्यामुळे सध्या देशात आनंदाचे वातावरण आहे.
यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन दौऱ्यारदम्यानच केले होते. पण आता त्यांनी दौरा आटोपल्यानंतर दिल्लीत न जाता बंगळुरूला जाण्याचं ठरवलं आहे. तर येथे ते इस्रोच्या शास्त्रज्ञांना भेटणार आहेत. तसेच बेंगळुरूला जाऊन ते चांद्रयान-3 मोहिमेत सहभागी झालेल्या इस्रो टीमच्या शास्त्रज्ञांशी संवाद साधणार आहेत.
Published on: Aug 26, 2023 08:46 AM