लोकसभेची लगबग ! पंतप्रधान मोदी दर महिन्याला करणार महाराष्ट्राचा दौरा, तारखा कोणत्या असणार?
VIDEO | आगामी लोकसभा निवडणुकांआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष, कधी करणार महाराष्ट्र दौरा?
मुंबई : 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या जूनपासून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांच्या महिन्यातून किमान एकदा तरी भेट दौऱ्यावर असणार आहेत. मोदी सरकारला नऊ वर्षपूर्ण होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॅट्रिक करण्याची तयारी सुरू केली आहे. मोदी सरकारला 30 मे रोजी नऊ वर्ष पूर्ण होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा आनंद साजरा करण्याऐवजी 2024 च्या निवडणुकांची तयारी करताना दिसत आहे. 30 मे ते 30 जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या सरकारच्या नऊ वर्षांच्या कार्यक्रमांमध्ये 2024 च्या तयारीचा देखील समावेश असणार आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुका म्हणजेच पाच राज्यांच्या विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या विधानसभा निवडणुकांमुळे राज्यांमध्ये आपले कार्यक्रम निश्चित केले आहेत. उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 80 जागा लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी आता पूर्व उत्तर पासून सुरुवात करून दर महिन्याला एक किंवा दोन दिवस उत्तर प्रदेशला तर दुसऱ्या क्रमांकाचा राज्य असलेल्या महाराष्ट्रातील 48 जागा लक्षात घेऊन मोदी पुढील महिन्यांपासून प्रत्येक महिन्यात किमान एकदा तरी महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.