प्रितम मुंडे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? पंकजा मुंडे यांच्याकडून उमेदवारीचे संकेत?
मनोज जरांगे पाटील यांच्या मेळाव्याबाबत आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असणार का? असा सवाल माध्यमांच्या प्रतिनिधीकडून पंकजा मुंडे यांना करण्यात आला असता काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
विजयादशमीच्या निमित्ताने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा बीड जिल्ह्यात सावरगाव येथे दसरा मेळावा होत आहे. या दसऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि त्यांचे बंधू, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे पहिल्यांदाच एका मंचावर एकत्रित पाहायला मिळत आहे. पंकजा मुंडे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना मनोज जरांगे पाटील यांच्या मेळाव्याबाबत विचारण्यात आलं. ‘नारायण गडावर आज एक मेळावा होत आहे. आमचा मेळावा तर दरवर्षी होत असतो. पण नारायण गडावर आज मेळावा होतोय हे खरं वैशिष्ट्ये आहे. मनोज जरांगे पाटील हे नारायण गडावरच्या मेळाव्याला येणार आहेत. ते काय बोलतील याची उत्सुकता आहे’ असे त्या म्हणाल्या. यावेळी प्रितम मुंडे यांच्या उमेदवारीबाबत भगवान भक्तीगडावर बोलणार असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. प्रितम मुंडे सोबत असणार का? यासह विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असणार का? असा सवाल माध्यमांच्या प्रतिनिधीकडून पंकजा मुंडे यांना करण्यात आला असता त्यांनी पंकजा मुंडे यांच्याकडून उमेदवारीचे संकेत देण्यात आल्याचे पाहायला मिळाले.