Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण'चा लाभ महिलांना फक्त 3 महिनेच मिळणार? कुणी केला सरकारच्या दाव्यावर सवाल

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’चा लाभ महिलांना फक्त 3 महिनेच मिळणार? कुणी केला सरकारच्या दाव्यावर सवाल

| Updated on: Jul 05, 2024 | 11:21 AM

सरकारने महिलांना दर महिन्याला १५०० रूपये देण्याची लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा लभ मिळावा यासाठी महिलांची एकच धावपळ सुरू असताना आता विरोधकांकडून मोठा दावा करण्यात येत आहे. योजनेचे पैसे महिलांना केवळ तीन महिनेच मिळणार?

लाडकी बहीण योजना सरकारने घोषित तर केली. मात्र या योजनेच्या नोंदणीसीठी आवश्यक यंत्रणा दुरूस्त झाली नाही. रत्नागिरी, परळी बीडमध्ये सर्व्हर डाऊन असल्याने महिलांना मनस्ताप सहन करावा लागला. सोलापूरमध्ये ई सेवा केंद्रात योजनेच्या लिंकचा अॅक्सेस नाही. दरम्यान, निवडणुकीपुरतीच ही योजना आहे का? असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी केला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी वर्षाला ४६ हजार कोटी रूपयांची तरतूद केली असल्याचा दावा अजित पवार यांनी केला. मात्र प्रत्यक्षात अर्थसंकल्पामध्ये केवळ ३ महिन्यांचीच तरतूद केल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. कारण लाडकी बहीण योजनेसाठी वार्षिक ४६ हजार कोटींची तरतूद आवश्यक आहे. मात्र आता सरकारने १० हजार कोटी म्हणजेच येत्या तीन महिन्यासाठीची ही तरतूद केली आहे. तर योगायोगानं ३ महिन्यांनी निवडणुका असल्याने विरोधक हेतूंवर शंका उपस्थित करताय? बघा कुणी केली शंका उपस्थित?

Published on: Jul 05, 2024 11:21 AM