निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्णय; कृषी कायदे रद्दवरून पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपावर निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपा आणि मोदींवर निशाणा साधला आहे.
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपा आणि मोदींवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, हा निर्णय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेण्यात आला आहे. मात्र काही का असेना या निर्णयामुळे आम्हाला आनंद झाला. आता कायदे रद्द करण्यासाठी हिवाळी अधिवेशनाची वाट न पहाता, अध्यादेश काढून तातडीने हे कायदे रद्द करावेत.
Latest Videos