Maharashtra politics : बंडखोरांच्या निलंबनाचा फडणवीसांचा डाव – पृथ्वीराज चव्हाण
महाविकास आघाडी सरकार अस्थिर बनले आहे. आता उद्याच बहुमत सिद्ध करा असे आदेश राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. यावरून पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपावर टीका केली आहे.
महाविकास आघाडी सरकार अस्थिर बनले आहे. आता उद्याच बहुमत सिद्ध करा असे आदेश राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. राज्यपालांच्या पत्रामुळे महाविकास आघाडी सरकारच्या गोटात खळबळ उडाली आहे. आता महाविकास आघाडी सरकार याविरोधात कोर्टात धाव घेणार आहे. दरम्यान या सर्व प्रकरणावर आता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांचा बंडखोरांच्या निलंबनाचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Published on: Jun 29, 2022 10:04 AM
Latest Videos